Lohara Taluka crop damageलोहारा तालुक्यात अतिवृष्टीचा कहर: शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी |

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

लोहारा : Lohara Taluka crop damage : काल अतिवृष्टीमुळे झालेल्या लोहारा तालुक्यातील पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांची मागणी.

Lohara Taluka crop damage

काल 17 मार्च रोजी सायंकाळी 7 ते 9 च्या दरम्यान लोहारा तालुक्यात प्रचंड प्रमाणात गाराचा पाऊस पडून अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे उभे असलेले ज्वारी गहू हरभरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कलिंगड द्राक्ष आंबा या फळ पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आह हाता तोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटाने हिरावून घेतल्याने शेतकरी हातबल झाला आहे.

Lohara Taluka crop damage

मराठवाड्यातील विशेषता धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील शेतकऱ्याकडे शेतीच्या उत्पादनाशिवाय अन्य दुसरे कुठलेही उत्पादनाचे साधन नसल्यामुळे शेतकरी व त्याचे कुटुंब केवळ आणि केवळ शेतीवर अवलंबून आहे. काल झालेल्या गारपीट व अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णता कोलमडला असून त्याला आर्थिक आधाराची गरज आहे.

काल झालेल्या शेती पिकाचे एस डी आर एफ आय डी आर एफ अंतर्गत पंचनामे करून त्यांना तातडीने नुकसान भरपाई येऊन आर्थिक दिलासा द्यावा ही नम्र विनंती कशी आदेश महसूल व कृषी प्रशासनाला द्यावेत ही देखील विनंती.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे ही मागणी केली आहे याची एक प्रत माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांनाही देण्यात आलेली आहे.