धाराशिव : Kharif 2025 Crop Insurance : आंदोलनाचा दणका.. खरीप 2025 चा पिक विमा तातडीने वाटप करा जिल्हाधिकारी धाराशिव यांचा पिक विमा कंपनीला आदेश..धाराशिव जिल्ह्यात चालू वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले राज्य शासनाने केलेल्या पिक विमा योजनेतील बदलानुसार यावर्षी तो पी कापणी प्रयोगा आधारेच नुकसान भरपाई देण्यात येत आहे.
धाराशिव जिल्ह्यात एकूण 504 पीक कापणी प्रयोगाचे आयोजन केले होते त्यातील 217 पिकअप मी प्रयोगावरती पिक विमा कंपनीने आक्षेप घेतले होते त्यातील दोनशे पीक कापणी प्रभावी अक्षय जिल्हास्तरीय समितीने फेटाळून 22 डिसेंबर रोजी या संदर्भात निर्णय दिला होता व 17 पीक अपनी प्रयोग रद्द केले होते त्याविरुद्ध कंपनीने राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे अपील दाखल केले होते त्याचाही निकाल शेतकऱ्याच्या बाजूने लागला मात्र पिक विमा कंपनी शेतकऱ्याला पैसे देत नव्हती.

त्यामुळे पिक विमा कंपनी शासन प्रशासनाकडे विनंती करूनही काही उपयोग होत नसल्याने अखेर शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली पाच मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले त्यानंतर 14 मे रोजी आमदार प्रवीण स्वामी सर व अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली नारंगवाडी तालुका उमरगा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याच दिवशी माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांनी तातडीचे आदेश काढून पिक विमा कंपनीला धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची एक नुकसान भरपाई देण्याचे आदेशित केले आहे अन्यथा प्रचलित कायद्यानुसार कारवाईचा बडगा उचलणार असल्याचे देखील सूचित केले आहे.
शेतकरी नेते आणि जगताप हे वारंवार शेतकरी हिताची भूमिका घेतात त्यांना आता उमरगा लोहारा तालुक्याचे लोकप्रिय आमदार प्रवीण स्वामी सर यांची देखील भक्कम अशी साथ मिळत आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील बळीराजाचे प्रश्न मार्गी लागण्याचे चिन्ह दिसत आहेत.

नारंगवाडी येथील रस्ता रोको आंदोलनादरम्यान जर आणखी दहा दिवसात पिक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा नाही झाल्यास जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे सूचित केले होते त्यानंतर वेगाने घडामोडी घडवून जिल्हाधिकारी यांच्या सहीने पिक विमा कंपनीला शेतकऱ्यांना तातडीने पैसे देण्याबाबत आदेशित केले गेले आहे.

