14 वगळलेल्या महसूल मंडळांना पीक विमा मिळवून देण्यासाठी 30 जुलैला लोहारा तहसीलसमोर धरणे आंदोलन; अनिल जगताप यांचा इशारा | Kharif 2025 Crop Insurance

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

लोहारा : Kharif 2025 Crop Insurance : वगळलेल्या 14 महसूल मंडळांना पीक नुकसान भरपाई देण्यासाठी 30 जुलै रोजी लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन अनिल जगताप यांची माहिती जिल्हाधिकारी धाराशिव यांची भेट घेऊन दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की,

खरीप 2025 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख 66 हजार शेतकऱ्यांनी चार लाख 93 हजार अर्जाद्वारे पिक विमा भरला त्यासाठी आयसीआयसी लोम्बार्ड या कंपनीला शेतकरी राज्य शासन व केंद्र शासनाचा मिळून 130 कोटी रुपयांचा विमा हप्ता गेला आहे. गेल्या वर्षीपासून राज्य शासनाने नवीन पिक विमा योजना आणली असून त्यात नुकसान भरपाई देण्याचे चारही ट्रिगर बंद केल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे पेरणीपासून कापणी पर्यंत केवळ पीक कापणी प्रयोग आधारित पीक नुकसान भरपाई दिली जाते. धाराशिव जिल्ह्यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला जवळपास 161 टक्के इतका पाऊस झाला पिकाचे अतोनात नुकसान झाले.

जमिनी खरवडून गेल्या पशुधन हानी झाली मनुष्यहानी झाली त्यानुसार राज्य शासनाने शासन निर्णय काढून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली आहे मात्र विमा योजनेत असलेल्या तरतुदीनुसार गेल्यावर्षीपासून 50% रक्कम कापणी प्रयोगाद्वारे व 50 टक्के रक्कम सॅटॅलाइट इमेज अर्थात तांत्रिक उत्पादनावर आधारित देण्यात येत असल्याने 14 महसूल मंडळातील तांत्रिक उत्पादन जास्त दाखवले गेल्याने 14 महसूल मंडळे पिक विमा रक्कम मिळण्यापासून वंचित राहिली आहेत गेल्या वर्षी शासनाने प्रचंड प्रमाणात पाऊस झाला पिकाच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे मान्य करून शासकीय मदत दिलेली आहे मात्र त्याच्या विरुद्ध बाजूने पिक विमा कंपनी वागत असून अर्धा धाराशिव जिल्हा पिक विमा रकमेपासून वंचित ठेवला गेला आहे हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यावरती अन्याय

शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने अनिल जगताप यांना साकडं आणि लक्ष देण्याची विनंती…

Kharif 2025 Crop Insurance

लोहारा वगळलेल्या सास्तुर माकणी जेवळी या तीन महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांनी भेट घेऊन सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने यात अर्थात अनिल जगताप यांनी या प्रकरणात लक्ष देण्याची विनंती केली असून 80 टक्के लोहारा तालुका मदतीपासून वंचित राहत असल्याने चिंता व्यक्त करून आम्हाला कोणीच वाली उरला नसून तुम्हीच लक्ष घालून पिक विमा मिळवून देण्याची विनंती केली. शेतकऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकूनp घेऊन यात आपण लक्ष घातले असून कालच राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे याचिका दाखल केली असल्याचे सांगितले तसेच शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपनाने उभे राहून कुठल्याही परिस्थितीत पिक विमा मिळूनच देऊ असे आश्वासन देखील त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

कालच अर्थात 16 जुलै रोजी तांत्रिक समितीकडे अनिल जगताप यांची याचिका दाखल..

कालच पिक विमा अभ्यासक आणि जगताप यांनी वगळलेल्या 14 महसूल मंडळाला पुन्हा पिक विमा मिळावा यासाठी राज्यस्तरीय तंत्रिक समितीकडे याचिका दाखल केली असून तातडीने बैठक घेऊन कंपनीला पीक नुकसान भरपाई देण्याबाबत आदेशित करावे अशी विनंती केलेली आहे.

जरी तांत्रिक उत्पादनात बाद ठरवून 14 महसूल मंडळातील लाखो शेतकऱ्यांना पीक कमी पासून वंचित ठेवले असले तरी पिक विमा परिपत्रक व शासन निर्णयातील तरतुदीनुसार परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाकडून पीक नुकसानीबाबत अहवाल घेण्यात आला असून तो माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून राज्य शासनाच्या कृषी विभागालाही पाठवण्यात आला आहे त्यात आणखी सुधारणा करून दुसरा अहवाल एक दोन दिवसांमध्ये घेऊन राज्य शासनाच्या कृषी सचिवाकडे देण्यात येईल असे देखील अनिल जगताप यांनी सांगितले सर्व तांत्रिक बाबीची पूर्तता करून कुठल्याही परिस्थितीत वगळलेल्या 14 मुसलमान पिक विमा मिळूनच देणार असा विश्वास देखील श्री अनिल जगताप यांनी व्यक्त केला.

Kharif 2025 Crop Insurance

एकीकडे राज्यस्तरीय समितीकडे याचिका दाखल तर 30 जुलै रोजी लोहारा तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन..

एकीकडे कायदेशीर लढाई दिली जात असून दुसरीकडे रस्त्यावरची लढाई देखील आता उभी केली गेली असल्याचे दिसून येत आहे लोहारा तहसील कार्यालयासमोर 30 जुलै रोजी अकरा वाजता हजारो शेतकऱ्यांना घेऊन अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, त्यानंतर रस्ता रोको मोर्चा उपोषण इत्यादी मार्गाचा अवलंब देखील केला जाईल असे अनिल जगताप यांच्या वतीने सांगण्यात आले.